दहशतवाद मानवतेचा मोठा शत्रू असून त्याविरोधात एकजुटीनं लढण्याचं गृहमंत्र्यांचं आवाहन

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची पाचवी राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवत असून ते आज  आणि उद्या परिषदेला उपस्थित राहतील.  राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे. यावर्षी या परिषदेचा मुख्य विषय ‘विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं भांडवल’ असा असून यात राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या विषयांतर्गत प्रामुख्यानं शालेय पूर्व शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण तसंच क्रीडा आणि अतिरिक्त उपक्रम या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

प्रशासनात तंत्रज्ञान, संधी, जोखीम  आणि समाधान ,जागतिक पुरवठासाखळी, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी, तसंच अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या बीमोडानंतरचा भविष्यकाळ या विषयांवर परिषदेत विचारविमर्श होणार आहे.