केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याच्या संकल्पाचा आज पुनरुच्चार केला. छत्तीसगडच्या जगदालपूर इथे बस्तर दसरा लोकोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून देऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. नक्षलवादाच्या समस्येमुळे बस्तर भाग अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. पारंपरिक मुरिया दरबारमध्येही ते सहभागी झाले.
आज त्यांच्या हस्ते २५० दुर्गम गावांसाठी ३४ मार्गांवरची बस सेवा सुरु करण्यात आली. महतारी वंदन योजनेअंतर्गत ७० लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये विसावा हप्ता म्हणून सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.