सुसंस्कृत समाजात हिंसा आणि दहशतवादाला स्थान नाही, सरकारने नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. अमित शहा दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. नवा रायपूर मधे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिवर्सिटी आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीच्या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते.
सुरक्षा दलं ज्याप्रकारे मोहिमा राबवत आहेत त्यानुसार नक्षलवादमुक्त भारताचं उद्दिष्ट पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा आणि छत्तीसगडच्या उभारणीत योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.