डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘काश्मीरमधे ३ संघटना विघटनवादी हुरियत कॉन्फरन्स पासून वेगळ्या निघाल्या हे जनतेच्या संविधानावरच्या विश्वासाचं निदर्शक’

काश्मीरमधे ३ संघटना विघटनवादी हुरियत कॉन्फरन्स पासून वेगळ्या निघाल्या हे जनतेच्या संविधानावरच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. आतापर्यंत अशा ११ संघटनांनी विघटनवादी भूमिका सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. शाह यांनी काल भारत पाकिस्तान सीमेजवळच्या एका लष्करी चौकीला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या समवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकही घेतली.