डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 16, 2024 8:03 PM | Home Minister Amit Shah

printer

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले – गृहमंत्री अमित शहा

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. किश्तवरमधल्या पड्डेर – नागसेनी मतदारसंघात सुनिल शर्मा यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहिरनाम्यात दहशतवाद्यांना मुक्त करण्याचा उल्लेख आहे असा आरोप शहा यांनी केला. सरकार स्थापन केल्यानंतर ३७० कलम पुनर्स्थापित करू, असं वचन काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने दिलं आहे.  त्यामुळे त्यांना पहाडी, गुज्जर आणि इतरांचं आरक्षण हिसकावून घ्यायचं आहे असा आरोप शहा यांनी केला.