प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यदलाच्या डीजीएमओ मधलं आज दुपारी १२ वाजता नियोजित असलेलं संभाषण आज संध्याकाळी होणार असल्याचं वृत्त आहे.