महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निवडणुकी संदर्भात न्यायालयात विविध याचिका दाखल असून त्यावरची सुनावणी होईपर्यंत निवडणूक घेऊ नये असं न्यायालयाने म्हटलं आहे. क्रिकेटपटू केदार जाधव, तसंच सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि इतक काही याचिकाकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर या निवडणुकीला आव्हान दिलं आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान होणार होतं.
Site Admin | January 6, 2026 1:30 PM | Cricket | MCA | Mumbai high Court
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती