डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुढील तीन दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसांत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि  राजस्थानच्या पूर्व भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आज मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दिवसांत पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्येही हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यात, तसंच  झारखंडमध्येही पुढील दोन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या ३० ऑगस्टपर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतचा समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर, विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात  मच्छिमारांनी जाऊ नये  असा   सल्ला  भारतीय हवामान विभागानं दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.