महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं पुराची शक्यता लक्षात घेत १८ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली लहान नौका उलटून तीन मासेमार पाण्यात फेकले गेले. यातील दोघेजण बचावले आहेत. बेपत्ता मासेमाराचा शोध सुरू आहे.
Site Admin | July 9, 2025 9:26 AM | Heavy rain | Maharashtra
राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
