डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. राज्यातल्या शाळा आजपासूनच सुरु झाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि पालकांची पावसाने तारांबळ उडवली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी येत असून पुढचे दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. घाटमाथ्यावरही पावसाचं मान असून विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस होत आहे. राज्यात सर्वत्र आपत्ती प्रतिसाद दलाची यंत्रणा सज्ज आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा