महाराष्ट्रात पावासाचा जोर कायम

महाराष्ट्रात गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात तीन, जालना दोन तर मुंबई, रायगड आणि अहिल्यानगर मध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्याचे आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळा बैठकीत दिले आहेत. 

 

दरम्यान, महाराष्ट्रातल पावसाळ्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. लातूरमध्ये तीन दिवसांत सरासरी २०६ मिलीमिटर पाऊस पडला, तर अहिल्यानगरमध्ये २०१.२ मिलीमीटर पाऊस पडला. पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

 

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. 

 

अकोल्यात काल सुमारे १३० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे अनेक घरात, पाणी शिरलं. साहित्याचे नुकसान झाले. चार ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. शहरात काही भागांत वीज पुरवठा  खंडित झाला. पावसामुळे फळबागा, ज्वारी, कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान झालं आहे. 

 

नांदेडमध्ये हदगाव तालुक्यात वरवटी इथं काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे आलेल्या पुरात ३ जण वाहून गेले. 

 

अहिल्यानगरमध्ये वालुंबा नदीजवळ अडकलेल्या १५ रहिवाशांना स्थानिक आपत्ती पथकांनी वाचवलं आहे.

 

धुळे जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने जिल्ह्या पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

 

सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाचा जोर आज सकाळपासून वाढला आहे. जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे. 

 

रत्नागिरीत काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून आज आठ दिवसांनी सूर्यदर्शन झालं. लांज्यात गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ११८ मिलिमीटर पाऊस पडला.

 

मुंबई आणि उपनगरातही पावसानं आज विश्रांती घेतली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.