येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, आज कोकणात पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात जिल्हयात ५८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कणकवली तालुक्यात १३० मिमी पावसाची नोंद झाली.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी भरलं आहे. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.