कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्रप्रदेशचा किनारपट्टी भाग, आणि झारखंडच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर देशाच्या ईशान्येकडेच्या प्रदेशात पुढले ७ दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम राजस्थानमध्ये उद्या उष्णतेची लाट राहील आणि धुळीचं वादळ येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.