डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या ३ दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या तीन दिवसात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढचे चार दिवस अति जोरदार पाऊस होईल.

 

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पश्चिम राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने कळवलं आहे.