कोकण आणि गोवा, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून २८ मेपर्यंत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, तेलंगण आणि दक्षिण गुजरातमध्ये आज आणि उद्या बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात काल रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली आणि दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
Site Admin | May 25, 2025 3:12 PM | Heavy rain
देशात २८ मेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज
