देशात मुसळधार पावसाचा इशारा

कर्नाटकमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. त्यासह तामिळनाडू, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.उद्यापासून मुंबईतही मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के जेनामानी यांनी दिली आहे. देशातल्या उत्तर भागात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले.