महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढच्या पाच दिवसांत जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये पुढचे पाच ते सहा दिवस विजांसह वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे.
राजस्थानमध्ये २२ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरसह आसपासच्या भागात उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून उत्तराखंडमध्ये २४ मेपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागात नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे.