केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तरप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये दोन्ही राज्यांमधून उडीद, तूर,मूग या डाळींच्या पूर्ण खरेदी सोबतच तीळ, भुईमूग आणि सोयाबीन या तेलबियांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे. त्यासाठी अंदाजे १३ हजार आठशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही पूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक, डिजिटल आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून पार पाडण्याची गरज चौहान यांनी काल त्यांच्या अध्यक्षतेखाली दूरस्थ पद्धतीनं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. या उपक्रमाचा लाभ केवळ खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा यावर त्यांनी भर दिला तसंच याचा अडते किंवा मध्यस्थांकडून गैरफायदा घेतला जाऊ नये असे निर्देश चौहान यांनी या राज्यांना दिले. ही खरेदी प्रक्रिया पोर्टलद्वारे ई-समृद्धी आणि ई-संयुक्ती या पोर्टलच्या माध्यमातून पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं केली जाणार आहे.
Site Admin | September 24, 2025 10:37 AM | Gujarat | uttarpradesh
उत्तरप्रदेश आणि गुजरात राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी
