बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध होते. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवजांची देवाणघेवाण आवश्यक असल्यानं गुजरात आणि महाराष्ट्राच्या पुराभिलेखागार यांनी सामंजस्य करार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज दिले. मंत्रालयात पुराभिलेखागार विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.
बडोद्याचे महाराज सयाजीराव जाधव यांच्या मातोश्री महाराणी जमनाबाई गायकवाड यांचं माहेर सातारा जिल्ह्यात रहिमतपूर इथं आहे. त्या ठिकाणी जमनाबाई यांचं स्मारक उभारण्याची मागणी होत आहे. यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी स्मारकाबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचना शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.