डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गुजरातमधे ८ हजार ३२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

गुजरात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८ हजार ३२६ गावांमधल्या  ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. मुरली कृष्णा यांनी आज गांधीनगर इथं वार्ताहर  परिषदेत ही घोषणा केली. निवडणुकीची अधिसूचना येत्या २ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ जून असेल तर  छाननी १० जून रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज ११ जूनपर्यंत मागे घेता येऊ शकतील . तर मतदान येत्या २२ जून रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी  ६ वाजेपर्यंत होईल आणि मतमोजणी २५ जून ला  होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा