जीएसटी परिषदेची ५६वी बैठक येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.
जीएसटीमधला १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात यासंबंधीचे संकेत दिले होते.