ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे मात्र आर्क्टिक बेटाची मालकी वॉशिंग्टनकडे द्यावी या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला आहे. दावोसमध्ये आर्थिक मंचाच्या परिषदेला संबोधित करताना ग्रीनलँडच्या अधिग्रहणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने वाटाघाटी करू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्धस्वायत्त प्रदेश आहे. ग्रीनलँडने मात्र अमेरिकेचा भाग होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. मात्र या बेटावर आधीपासूनच एक लष्करी तळ आहे.
दरम्यान, ग्रीनलँडवरील अमेरिकेच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावरून युरोपमधील अमेरिकेच्या मित्र देशांवर लावण्यात येणारे नियोजित निर्यात शुल्क रद्द करत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ग्रीनलँडवर मालकी हक्क मिळवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच तासांत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी बळाचा वापर करणार नाही असे सांगतानाच युरोपिय मित्रराष्ट्रांविषयी उपहास व्यक्त करतानाच नाटोने अमेरिकेच्या विस्तारवादाला रोखण्याचा प्रयत्न करू नयेही असेही आपल्या दावोस इथल्या भाषणात म्हटलं आहे.
Site Admin | January 22, 2026 1:36 PM | america donald trumpt | Donald Trump | Greenland
ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नाही- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प