डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 3, 2025 10:07 AM | Divya Deshmukh

printer

ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाकडून सत्कार-तीन कोटी रुपये पारितोषिक प्रदान

बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार करण्यात आला.

 

दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळवलेलं देदीप्यमान यश हे देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दिव्याला तीन कोटी रुपये बक्षीस सरकारकडून प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही दिव्याला ११ लाख रुपये बक्षीस देण्यात आलं. खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही तिचा सन्मान करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा