पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारची पीकनिहाय मोहीम सुरू

पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार पीकनिहाय मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेची सुरुवात सोयाबीन पिकापासून इंदूर इथं होईल, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. या मोहिमे अंतर्गत शेतकरी, शास्त्रज्ञ आणि शेतीशी संबंधित लोक एकत्र येऊन सोयाबीनचं उत्पादन वाढवण्याविषयी चर्चा करतील. त्यानंतर कापूस, ऊस आणि तेलबियांसंबंधी अशी चर्चा आयोजित केली जाईल, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.