राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या. यात हरियाणाच्या राज्यपालपदी प्रोफेसर अशीम कुमार घोष, गोव्याच्या राज्यपालपदी पशुपती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखचे नायबराज्यपाल निवृत्त ब्रिगेडिअर डॉ. बी.डी. मिश्रा यांचा राजीनामा राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती केली आहे.
Site Admin | July 14, 2025 7:16 PM | Governor
दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर
