July 14, 2025 7:16 PM

views 41

दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी दोन नवीन राज्यपाल आणि एका नायब राज्यपालांच्या नियुक्त्या आज जाहीर केल्या. यात हरियाणाच्या राज्यपालपदी प्रोफेसर अशीम कुमार घोष, गोव्याच्या राज्यपालपदी पशुपती अशोक गजपती राजू  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखचे नायबराज्यपाल निवृत्त ब्रिगेडिअर डॉ. बी.डी. मिश्रा यांचा राजीनामा राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. 

January 7, 2025 9:13 AM

views 22

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन सादर

बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांकडे केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उप...

August 4, 2024 2:56 PM

views 32

सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा – राष्ट्रपती

राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः अनुसूचित जाती- जमाती आणि आदिवासींना या योजनांचा लाभ मिळावा याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचा वस्तुपाठ प्रस्थापित करणं ही राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी ...