डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं विठ्ठलचरणी साकडं

पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विठ्ठलाला घातलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह फडनवीस यांनी सपत्निक, विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर यावेळी उपस्थित होते. सर्व विठ्ठलभक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दांपत्याचा सन्मान, तसंच पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा श्रीविठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला.