डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जीईएम ही जगभरात सर्वात मोठी बाजारपेठ – सीईओ मिहीर कुमार

केंद्र सरकारची ऑनलाईन विपणन सुविधा अर्थात जीईएम हे ई-मार्केट जगभरात सर्वात मोठी, कार्यक्षम आणि परवडणारी बाजारपेठ ठरली असल्याचं जीईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहीर कुमार यांनी काल ऑनलाईन सुविधेच्या 8 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. GeMने 10 लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, एक लाखापेक्षा अधिक कारागीर आणि विणकर, 1 लाख 80 हजाराहून अधिक महिला उद्योजक आणि 31 हजार स्टार्टअप्सना या सेवेत सामावून घेतलं आहे. केवळ 8 वर्षांत, GeMसार्वजनिक स्तरावर खरेदीसाठी एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आले आहे. बाजापेठेचं आकारमान आणि बाजारमूल्य दोन्ही बाबतीत अभूतपूर्व यश मिळवलं असून एक मजबूत डिजिटल परिसंस्था म्हणून विकसित झालं आहे. असंही मिहीर कुमार म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.