गोवा, दिल्ली आणि हरियाणात ईडीचे छापे

गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या क्लबच्या मालकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्यावर सक्तवसुली संचालनालयानं आज गोवा, दिल्ली आणि हरियाणात छापे टाकले. क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लूथरा आणि सहमालक अजय गुप्ता यांची कार्यालयं आणि घरं, तसंच गोव्यातल्या अरपोरा गावाचे सरपंच रोशन रेडकर आणि पंचायत सचिव रघुवीर बागर यांची कार्यालयं आणि घरांमध्ये ईडीनं तपास केला. डिसेंबर महिन्यात या नाईट क्लबमध्ये आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. क्लबच्या मालकांपैकी एक असलेला ब्रिटिश नागरिक सुरिंदर कुमार खोसला याच्या घरीही ईडीचे अधिकारी हजर होते.