ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या.
शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फायदा मध्यस्थांच्या खिशात न जाता थेट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि याचा प्रभाव येत्या 22 तारखेपासूनच दिसायला हवा असं चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं