October 14, 2025 1:18 PM | Donald Trump | Gaza

printer

गाझा पट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या

गाझा पट्टीत गेली दोन वर्ष सुरु असलेला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प, इजिप्त आणि तुर्कीएचे अध्यक्ष आणि कतारचे अमीर यांनी काल इजिप्त मध्ये शर्म अल-शेख इथं स्वाक्षरी केली. यावेळी ३०पेक्षा जास्त देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.  

 

या शांतता शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,  इजिप्तचे अध्यक्ष  अब्देल-फत्ताह अल-सिसी, तुर्कीएचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी, यांनी हमास-इस्राएल  युद्धबंदी कराराचे हमीदार म्हणून भूमिका बजावली. जगासाठी आणि मध्य-पूर्वेसाठी हा ऐतिहासिक दिवस असून, यासाठी स्थानिक नेत्यांचे आपण आभारी असल्याचं  ट्रम्प यावेळी म्हणाले. 

 

हा करार म्हणजे एका वेदनादायक अध्यायाचा शेवट असून,  या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याच्या नव्या युगाची सुरुवात असल्याचं अल-सिसी म्हणाले.