गयाना मधल्या स्पार्टा इथल्या एसेक्विबो किनाऱ्यावरच्या सीता राम राधे श्याम मंदिरात हनुमानाची १६ फूट उंचीची एक मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. श्रद्धा, मैत्री आणि दृढतेचं प्रतीक असणारी ही मूर्ती भारतातून आयात करण्यात आली असून तीन दिवसांच्या धार्मिक विधींनंतर काल मंदिरात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रदेशातल्या हिंदू धर्मियांनी एकत्र येत प्रवचन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या एकतेचं दर्शन घडवलं.
Site Admin | May 19, 2025 2:49 PM | gayana hanuman murti
गयाना मधल्या सीता राम राधे श्याम मंदिरात हनुमान मूर्तीची स्थापना
