डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातली आत्मनिर्भरता महत्वाची असल्यातं ते म्हणाले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या समाज माध्यमावरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे. २०२०- २१ मध्ये गॅसचे उत्पादन सुमारे २८ अब्ज ७० कोटी घनमीटर होतं. जे २०२३-२४ मध्ये वाढून सुमारे अब्ज ४३ कोटी घनमीटर झालं आहे. २०२६ पर्यंत देशात गॅसचं उत्पादन ४५ अब्ज ३ कोटी घनमीटर पर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.