गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली शिबिरं उद्ध्वस्त

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे आज चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार आणि जखमी  झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी नक्षली शिबिरं उद्ध्वस्त केली असून त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे.