डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अल्काराज, इगा आणि अरीना यांची लढत

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आज कार्लोस अल्काराज, इगा श्वियांतेक आणि अरीना साबालेंका मैदानात उतरतील.

दरम्यान, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डचा ६-३, ६-३, ६-३ असा सहज पराभव केला.

पुरुष दुहेरीत आज भारताचा रोहन बोपण्णा त्याच्या जोडीदारासोबत अमेरिकेच्या जोडीशी लढत देईल. याशिवाय, युकी भांब्री, ऋत्विक चौधरी बोल्लीपल्ली हेदेखील आपापल्या जोडीदारांसोबत मैदानात उतरतील.