फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत रोहन बोपण्णा, युकी भांब्री, एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलिपल्ली हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील. पहिल्या फेरीत रोहन बोपण्णा याचा सामना चेक प्रजासत्ताकाच्या ॲडम पावलासेक याच्याशी होईल. पुरुष दुहेरी प्रकाराच्या पहिल्या फेरीत युकी भांब्री आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गेलोवे यांचा सामना नेदरलँड्सचा रॉबिन हासे आणि जर्मनीच्या हेंड्रिक जेबेन्स यांच्याशी होणार आहे. एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकन जोडीदार मिगुएल अँजेल रेयेस-वरेला यांचा सामना अर्जेंटिनाचा कॅमिलो उगो काराबेली आणि चीनच्या युनचाओकेट बु यांच्याशी होईल.
Site Admin | May 25, 2025 3:06 PM | French Open tennis
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ
