‘निवडून आल्यास अमेरिकेला जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू’

आपण निवडून आलो तर अमेरिकेला या जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू, असं आश्वासन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. नॅशव्हिल इथं आयोजित बिटकॉइन २०२४ या परिषदेत ते बोलत होते. आपलं प्रशासन क्रिप्टो चलनासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी सल्लागार समितीही स्थापन केली जाईल, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.