देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक्स समाजमाध्यमावर पंडित नेहरु याचं स्मरण केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसंच काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी दिल्लीत शांतिवन या पंडित नेहरूंच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली.