डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं निधन

गडचिरोली जि्ल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

हरिराम वरखडे हे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आरमोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे १९९२ मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांच्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.