August 5, 2025 1:21 PM

views 56

खासदार आणि आमदारांविरुद्धचे फौजदारी खटले वेगाने निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

खासदार आणि आमदारांविरुद्धचे फौजदारी खटले वेगाने निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. असे खटले हाताळणाऱ्या रजिस्ट्री आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांनी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसंच या संदर्भात उचललेल्या पावलांबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीला सादर करावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.   सदर समितीने १७ जून, २४ जून आणि ७ जुलै रोजी झालेल्या बैठकींमध्ये या मुद्द्यावर चर्चा करून निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संबंधित अस...

November 3, 2024 4:12 PM

views 47

आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं निधन

गडचिरोली जि्ल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   हरिराम वरखडे हे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आरमोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे १९९२ मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांच्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रव...

August 31, 2024 2:20 PM

views 42

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची भाजपाच्या आमदारांची मागणी

दिल्लीतलं आप सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचं सरकार निष्प्रभ आहे, असा आरोप करत दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन दिलं. दिल्ली प्रशासनाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि त्यामुळे लोकहिताच्या कामांवर परिणाम होत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.