मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित पाच जणांना अटक, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजित सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे. सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं, खंडणी, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

त्याखेरीज या संघटनेच्या अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याखेरीज चुराचांदपूर आणि कांगपोकपी या जिल्ह्यांमधून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे साडे पाच किलो वजनाचे अंमली पदार्थ, २३ हजार रुपये रोख आणि १४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.