मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक उपाय योजले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या प्रगतीचा आणि भविष्यातल्या उपायांचा आढावा घेणाऱ्या बैठकीत बोलत होते. अति खोल समुद्रातली मासेमारी आणि सागरी खाद्यान्नाची निर्यात या मुद्द्यांवर या बैठकीत विशेष चर्चा झाली. मच्छीमारांना अधिक पतपुरवठा व्हावा तसंच बाजारपेठेपर्यंत सुलभपणे पोहोचता यावं, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
Site Admin | May 15, 2025 8:01 PM | Fisheries Sector | PM Narendra Modi
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा बळकटीसाठी अनेक उपाययोजना – प्रधानमंत्री