डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या ४७ हजाराच्या वर

 

राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. यामध्ये १८ ते १९ वयोगटातले एकूण २२ लाख २२ हजार ७०४, तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.

 

राज्यातल्या एकूण मतदारांमध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला, तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रं उभारली जाणार आहेत. यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४, तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्रं असतील.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.