जॉर्जियात बटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत काल भारताच्या दिव्या देशमुखनं चीनच्या टॅन झोंगी हिला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं.पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून, दिव्यानं २०२६ मध्ये होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही स्थान मिळवलं आहे आणि तिचा पहिला ग्रँड मास्टर निकषही पार केला आहे. १९ वर्षांची दिव्या फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत कोेनेरु हम्पी आणि ली टिंगजी यांच्यातला पहिला सामना अनिर्णित राहिला. टायब्रेकरमधे जिंकणाऱ्या खेळाडूचा सामना अंतिम फेरीत दिव्या देशमुखबरोबर होईल.
Site Admin | July 24, 2025 1:05 PM | Divya Deshmukh | FIDE Women’s World Cup Final
दिव्या देशमुख FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
