डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू काश्मीरच्या प्रश्नांबाबत भारताची भूमिका कायम – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

जम्मू काश्मीरच्या प्रश्नांबाबत भारताची भूमिका अनेक वर्षांपासून कायम असून हे प्रश्न भारत आणि पाकिस्तानला सोडवावे लागतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या काश्मीरची सुटका हा प्रलंबित मुद्दा असल्याचं जयस्वाल म्हणाले. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून शस्त्रसंधी होईपर्यंत भारत आणि अमेरिकेत चर्चा सुरू होती, मात्र यात व्यापाराचा मुद्दा नव्हात असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधु जल करार स्थगित करण्यात येईल असंही जयस्वाल यांनी सांगितलं.