डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 20, 2024 1:28 PM | Delhi

printer

दिल्लीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेबाहेर स्फोट

दिल्लीतल्या रोहिणी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेबाहेर आज सकाळी स्फोट झाल्याचं वृत्त आहे. घटनेचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. स्फोटात कोणीही जखमी झालेलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून जवळच्या दुकानाच्या काचेचं आणि दुकानाजवळ उभ्या असलेल्या गाडीच्या काचांचं नुकसान झालं आहे. बॉम्बनाशक पथक, न्यायवैद्यकशास्त्र पथक आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.