महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. नुकतेच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून 47 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये दिली. इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह झालेल्या गोलमेज परिषदेनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले…
गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे. ती आघाडी कायम ठेवत पुन्हा एकदा आम्ही 1 लाख 8 हजार 599 कोटी रुपयांचे करार केलेले आहेत. ज्यातनं जवळपास 47 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. कोकण विभागामध्ये दोन डेटा सेंटर चे करार केले आहेत. ज्यामध्ये एमजीएसए रियल्टीज 5 हजार कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटर मध्ये आणि लोडा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटर मध्ये 30 हजार कोटी रुपये गुंतवणार आहेत. एकूण 35 हजार कोटींच दोघांची गुंतवणूक आहे. सोळा हजार लोकांना यातून रोजगार मिळणार आहे.