डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १ जुलै २०२५ पर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे घेतल्या जातील असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं काल स्पष्ट केलं. 

 

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दृक-श्राव्य माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाणार नाही, त्याऐवजी भारतीय निवडणूक आयोगाच्या याद्या वापरल्या जातील.

 

वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष अपंग मतदारांसाठी मतदान केंद्रे पुरेशा सुविधांनी सुसज्ज आहेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले असून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची उपलब्धता आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यावर भर दिला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा