6 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण वेळापत्रकात सुधारणा

भारतीय निवडणूक आयोगानं सहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. यामध्ये तमिळनाडु, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे.

 

ही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मसुदा मतदार यादी या महिन्याच्या 16 तारखेला प्रकाशित केली जाईल. 6 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून विनंती मिळाल्यानंतर वेळापत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.