महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आधी २१ डिसेंबर रोजी होणार होती, ती आता ४ जानेवारी रोजी होणार आहे. तर गट ३ संयुक्त पूर्वपरीक्षा ११ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचं आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे.